नंदुरबार : राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रियेची जाहिरात निघाली आहे. मेगा भरती असून 19,460 जागांची भरती प्रकिया होणार आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये यातील 475 जागांची भरती होणार आहे. 25 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने 5 ऑगस्टपासून अर्ज करता येणार असून 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. या परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे. या पराक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय उमेदवारासांठी 18 ते 43 इतकी असणार आहे. तर दरमहा वेतन हे 19,900 ते 1,12,400 इतका असणार आहे.
आरोग्य सेवक (पुरूष) ४०% – १९
आरोग्य सेवक (पुरूष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) – ५१
आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)] – २८४
औषध निर्माण अधिकारी – ११
कंत्राटी ग्रामसेवक – १
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा) – १६
कनिष्ठ लेखा अधिकारी – २
कनिष्ठ सहाय्यक – २८
कनिष्ठ सहाय्यक लेखा – ७
मुख्य सेविका / पर्यवेक्षिका – ८
पशुधन पर्यवेक्षक – ११
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १३
विस्तार अधिकारी (कृषि) – १
विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी२) – ४
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) – १९
एकूण – ४७५
जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे.