Nanded Zilha Parishad Recruitment 2023 : नांदेडमध्ये जिल्हा परिषदेमध्ये 500 पेक्षा जास्त जागा, या तारखेपर्यंत भरा अर्ज!

| Updated on: Aug 07, 2023 | 8:28 PM

Zila Parishad Mega Bharti 2023: राज्यातील जिल्हा परिषदेतील मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. 19,460 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. नांदेड जिल्हा परिषदेची भरतीसाठी अर्ज भरणे सुरु झाले आहे.

Nanded  Zilha Parishad Recruitment 2023 : नांदेडमध्ये जिल्हा परिषदेमध्ये 500 पेक्षा जास्त जागा, या तारखेपर्यंत भरा अर्ज!
Follow us on

नांदेड : राज्यातील जिल्हा परिषदेच्या 34 जिल्यांमधील भरती प्रक्रिया शनिवारपासून झाली आहे. एकूण तब्बल 19, 460 पदांची भरती प्रक्रिया होणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेमध्ये यातील 628 जागांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

कोण राबवणार प्रक्रिया

जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे.

कसा करावा अर्ज

  • जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे.
  • अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
  • ५ ते २५ ऑगस्टपर्यंत हा अर्ज करता येणार आहे. याच कालवधीत परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) / अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) पदभरतीसाठी घोषित केलेली
संवर्गनिहाय सरळसेवेची रिक्त पदे
संवर्ग
आरोग्य पर्यवेक्षक – ४
आरोग्य सेवक (पुरुष) ४०% – ७०
आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) -४८
आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)] – २२५
औषध निर्माण अधिकारी – १९
कंत्राटी ग्रामसेवक – ८३
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा) – ५२
कनिष्ठ आरेखक – ३
कनिष्ठ सहाय्यक – २१
कनिष्ठ सहाय्यक लेखा – १
जोडारी – १
तारतंत्री – १
विस्तार अधिकारी (कृषि) – १
विस्तार अधिकारी (पंचायत) – १
विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी २) – १
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – ४
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे) – ३२

एकूण – ६२८

ऑनलाईन पद्धतीने 5 ऑगस्टपासून अर्ज करता येणार असून 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. या परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे. या पराक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय उमेदवारासांठी 18 ते 43 इतकी असणार आहे. तर दरमहा वेतन हे 19,900 ते  1,12,400 इतका असणार आहे.