Latur ZP Recruitment 2023 : लातूर जिल्हा परिषदेमध्ये ‘या’ जागांसाठी भरती, या तारखेपर्यंत भरा अर्ज!

| Updated on: Aug 07, 2023 | 8:18 PM

Zila Parishad Mega Bharti 2023: राज्यातील जिल्हा परिषदेतील मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. 19,460 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. लातूर जिल्हा परिषदेची भरतीसाठी अर्ज भरणे सुरु झाले आहे.

Latur ZP Recruitment 2023 : लातूर जिल्हा परिषदेमध्ये ‘या’ जागांसाठी भरती, या तारखेपर्यंत भरा अर्ज!
Follow us on

लातूर : राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रियेची जाहिरात निघाली आहे. मेगा भरती असून 19,460 जागांची भरती प्रकिया होणार आहे. लातूर जिल्हा परिषदेमध्ये यातील 628 जागांची भरती होणार आहे. 25 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारीच यासंदर्भात माहिती दिली होती.

ऑनलाईन पद्धतीने 5 ऑगस्टपासून अर्ज करता येणार असून 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. या परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे. या पराक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय उमेदवारासांठी 18 ते 43 इतकी असणार आहे. तर दरमहा वेतन हे 19,900 ते  1,12,400 इतका असणार आहे.

पदभरतीसाठी घोषित केलेली संवर्गनिहाय सरळसेवेची रिक्त पदे

आरोग्य पर्यवेक्षक – ३
आरोग्य सेवक (पुरुष) 40% – २२
आरोग्य सेवक (पुरुष) 50 % (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) – १०५
आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)] – २४६
औषध निर्माण अधिकारी – ७
कंत्राटी ग्रामसेवक – ४
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम /ग्रामीण पाणी पुरवठा) – २४
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – १
कनिष्ठ आरेखक – ३
कनिष्ठ यांत्रिक – १
कनिष्ठ लेखा अधिकारी – २
कनिष्ठ सहाय्यक – ४
कनिष्ठ सहाय्यक लेखा – ५
मुख्य सेविका / पर्यवेक्षिका – १०
पशुधन पर्यवेक्षक – २३
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १
लघुलेखक (उच्च श्रेणी) – १
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – ४
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम /लघु पाटबंधारे) – १०

एकूण – ४७६

कोण राबवणार प्रक्रिया

जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे.