RBI Repo Rate : RBI ची हॅटट्रिक! रेपो दर जैसे थे, महागाई कशी होईल कमी?

RBI Repo Rate : RBI ने रेपो दरात पुन्हा एकदा दिलासा दिला. सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कुठलीही वाढ झाली नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. आता महागाई कमी करण्यासाठी आरबीआय काय उपाय योजना करणार?

RBI Repo Rate : RBI ची हॅटट्रिक! रेपो दर जैसे थे, महागाई कशी होईल कमी?
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 2:05 PM

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीने (RBI Monetary Committee) सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कुठलाच बदल केला नाही. यापूर्वीच तज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवला होता. गेल्या दोन महिन्यात महागाई वाढली आहे. पण त्याचा परिणाम भारतीय अर्थ धोरणावर होणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. आरबीआयने रेपो दर (Repo Rate) 6.50 टक्के कायम ठेवला. यापूर्वी एप्रिल आणि जून महिन्यात सुद्धा व्याजदरात वाढ झाली नाही. रेपो दरात या वर्षात, फेब्रुवारी 2023 मध्ये बदल झाला होता. त्यावेळी 0.25 टक्के वाढ झाली होती. आरबीआयने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत व्याजदरात 2.50 टक्क्यांची वाढ केली. भारतीय अर्थव्यवस्था गतिमान असल्याने आनंद होत असल्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. भारत जगासाठी ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वच दरात जैसे थे

पतधोरण समितीने रेपो दर 6.5 टक्के ठेवला. स्टॅडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट बदलला नाही. एमएसएफआर 6.75 टक्क्यांवर कायम ठेवला. आरबीआय गव्हर्नरने एमपीसी महागाई 4 टक्क्यांपर्यंत आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जागतिक अर्थव्यवस्था सातत्याने अडचणींचा सामना करत असताना अनेक अर्थव्यवस्था लवचीक धोरण स्वीकारत आहेत.

हे सुद्धा वाचा

जीडीपीचा अंदाज काय

आरबीआयने जीडीपीविषयी अंदाज कायम ठेवला. आर्थिक वर्ष 2023-24 साठी जीडीपीचा अंदाज 6.5 टक्के ठेवण्यात आला. तर आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा अंदाज 8 टक्के, जुलै ते सप्टेंबर तिमाहीत 6.5 टक्के, ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत 6 टक्के होता. पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीचा अंदाज 6.6 टक्के ठेवण्यात आला आहे.

महागाईचा आलेख काय

आरबीआयने चालू आर्थिक वर्षात महागाई वाढण्याचा अंदाज वाढवला. आकड्यानुसार, आरबीआयने गेल्यावेळीचा अंदाज 5.1 टक्क्यांहून 5.4 टक्के केला आहे. जुलै-सप्टेंबर 2023 या काळात ग्राहक निर्देशांक आधारीत सीपीआय महागाईचा अंदाज 5.2 टक्क्यांहून 6.2 टक्के करण्यात आला आहे. पुढील वर्षासाठी हा अंदाज 5.2 टक्के ठेवण्यात आला आहे.

वर्षभरात इतकी वाढ

व्याज दरात वाढ करण्याची सुरुवात गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. रिझर्व्ह बँकेने एमपीसीने आपत्कालीन बैठक बोलावली होती. मे 2022 मध्ये आरबीआयने मोठ्या कालावधीनंतर रेपो दरात बदल केला होता. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला. एप्रिल आणि त्यानंतर जूनमध्ये रेपो दरात वाढ झाली नाही.

इतर देशांची अर्थव्यवस्था

जगातील अनेक केंद्रीय बँकांनी व्याज दरात वाढ केली आहे. फेडरल रिझर्व्ह बँकेने 26 जुलै रोजी व्याज दरात वाढ केली. व्याज दर 5.25 टक्क्यांवर पोहचला. महागाईला चाप लावण्यासाठी गेल्या 18 महिन्यापासून व्याज दरात वाढ होत आहे. 3 ऑगस्ट रोजी बँक ऑफ इंग्लडने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी 14 वी दरवाढ केली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.