Multibagger Stock : दौडा दौडा भाग भागसा! 100 वर्षांत एफडी नाही देणार, इतका परतावा अवघ्या 3 वर्षांत

Multibagger Stock : या शेअरने गुंतवणूकदारांची चांदी केली. 100 वर्षांतील एफडी नाही देणार इतका परतावा या शेअरने अवघ्या 3 वर्षांत दिला. तुमच्या पोर्टफोलिओत आहे का हा स्टॉक

Multibagger Stock : दौडा दौडा भाग भागसा! 100 वर्षांत एफडी नाही देणार, इतका परतावा अवघ्या 3 वर्षांत
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 9:57 AM

नवी दिल्ली : या शेअरने बाजारात (Share Market) नवीन रेकॉर्ड केला. अवघ्या काही रुपयांत मिळणारा हा स्टॉक आता बीएसईवर 157 रुपयांच्या घरात आहे. 100 वर्षांतील एफडी नाही देणार इतका परतावा या शेअरने अवघ्या 3 वर्षांत दिला. असे स्टॉक शोधणे आणि त्यांचे टेक्निकल ॲनालिसिस करणे, त्याची माहिती काढणे एवढचे काय तुम्हाला श्रम करावे लागतात. तसेच त्याचा ट्रॅकिंग रेकॉर्ड तपासा लागतो. त्यानंतर तुम्हाला भरभरुन फळ मिळते. त्यासाठी संयम ही महत्वाचा असतो. दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी असे मल्टिबॅगर स्टॉक (Multibagger Stock) लॉटरी पेक्षा कमी नसतात. दिग्गज कंपन्यांपेक्षा असे छोटे पॅकेट जोरदार धमका करतात. पैसा बनवितात.

कोणता आहे हा शेअर हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड (Hilton Metal Forging Limited) या शेअरचे नाव मल्टिबॅगर स्टॉकच्या यादीत येते. या शेअरने अवघ्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना 1,500% हून अधिकचा परतावा दिला आहे. हा मल्टिबॅगर स्टॉक 22 मे 2020 रोजी 8.69 रुपयांवर बंद झाला होता. आज BSE वर या स्टॉकची किंमत 157.25 रुपयांच्या घरात आहे. हा स्टॉक 0.16 टक्क्यांनी वधारला आहे. NSE वर पण स्टॉक 157 रुपयांच्या घरात आहे.

एक लाखाचे 17 लाख जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी हिल्टन मेटलच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर तो मालामाल झाला असता. त्याच्या 1 लाख रुपयाचे आज 17.59 लाख रुपये झाले असते. या दरम्यान सेन्सेक्स 101 टक्के वधारला असता. तीनच वर्षांत त्याला पुढील कित्येक वर्षाची कमाई करता आली असती. पण त्यासाठी अशा स्टॉकचा शोध आणि त्याची इतर माहिती असणे आवश्यक असते.

हे सुद्धा वाचा

तांत्रिक बाजू समजून घ्या बिझनेस टुडेने याविषयाचा एक अहवाल दिला आहे. टेक्निकल ॲनालिसिसनुसार, हिल्टन मेटल स्टॉक रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) 68.6 वर आहे. याचा सरळ असा अर्थ आहे की, या शेअरमध्ये तर ना जास्त खरेदी होत आहे, ना जास्त विक्री होत आहे. म्हणजे हा शेअर अधिक बुलिश नाही. हिल्टन मेटलच्या शेअरचा बीटा 0.8 आहे. हिल्टन मेटलचा शेअर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या सरासरीपेक्षा अधिक आहे.

कामगिरी कशी मेटल फर्मचा हा शेअर एका महिन्यात 13% वधारला आहे. बीएसईवर या कंपनीचे मार्केट कॅप 321.09 कोटी रुपयांनी वाढले आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात घसरण झाली. 27% टक्क्यांनी नफ्यात घट आली. तर विक्रीत 8% घसरण होऊन 30.66 कोटींच्या घरात आली. मार्च 2022 च्या तिमाहीत ही विक्री 33.29 कोटी रुपये होती.

कंपनीचे उत्पादन काय हिल्टन मेटल देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारासाठी उत्पादन तयार करते. ही कंपनी स्टील फोर्ज्ड फ्लँगेस, फिटिंग्स, ऑयलफिल्ड आणि मरीन उत्पादन निर्मिती आणि वितरणातील प्रमुख कंपनी आहे. या कंपनीच्या संकेतस्थळावर तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा, कंपनीचा अभ्यास जरुर करावा. गुंतवणूक तज्ज्ञ, विश्लेषकाची मदत आवश्य घ्यावी. त्याशिवाय गुंतवणूक करणे जोखमीचे ठरेल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.