TCS Job Scam : देवा, टीसीएस ही सुटले नाही! नोकर भरतीत महाघोटाळ्याचा आरोप, 100 कोटींचे कमिशन
TCS Job Scam : देशातील सर्वात मोठी कंपनी टीसीएस पण घोटाळ्यातून सुटली नसल्याचे समोर आले आहे. असा आरोप करण्यात येत आहे की, या कंपनीत नोकरी लावण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी उमेदवारांकडून पैसे घेतले.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सीमध्ये नोकर भरतीत महाघोटाळ्याचा (Job Scam) आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे कॉर्पोरेट सेक्टर हादरले आहे. या घाटोळ्यात चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भारतातील सर्वात मोठी टेक कंपनी TCS मध्ये नोकरीच्या बदलत्यात 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची बातमी समोर आली आहे. TCS मध्ये पैसे घेऊन नोकर भरती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांत TCS ने जवळपास 3 लाख तरुणांना नोकरी दिली आहे. पण यामध्ये घोटाळ्याचा आरोप करण्यात येत आहे. सध्या या कंपनीत 6 लाखांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. कन्सल्टन्सी फर्मच्या आडून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. TV9 मराठी या घोटाळ्याचे पुष्टीकरण करत नाही.
असा झाला घोटाळा टीसीएसमधील काही अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केल्याची चर्चा आहे. उमेदवारांना नोकरी देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून रक्कम घेण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. उमेदवारांना, कुशल मनुष्यबळाला नोकरीवर ठेवताना संबंधित फर्मकडून टीसीएस अधिकाऱ्यांनी रक्कम उकळल्याचा आरोप आहे. हा घोटाळा साधा नाही. तर 100 कोटी रुपयांचा महाघोटाळा आहे.
खासगी क्षेत्रातील मोठा घोटाळा सरकारी नोकरीसाठी, शैक्षणिक संस्थांवर लावण्यासाठी पैसे दिल्याचे अनेक प्रकरणे आपण पाहिली आहेत. पण एका नामांकित मोठ्या खासगी संस्थेत झालेला हा पहिला घोटाळा असल्याची चर्चा आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने उमेदवारांकडून आणि कन्सल्टन्सीकडून पैसे लाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या नोकरी घोटाळ्यात मोठे अधिकारी आहेत. आतापर्यंत याप्रकरणात चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कन्सल्टन्सी फर्मकडून या अधिकाऱ्यांनी मोठे कमिशन लाटल्याचा आरोप झाला आहे.
कसा झाला हा घोटाळा TCS मधील हा नोकरी घोटाळ्याच्या खुलासा एका व्हिसलब्लोअरने केला आहे. या व्यक्तीने TCS च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घोटाळ्याची माहिती दिली. त्यानंतर हा मोठा घोटाळा समोर आला आहे. व्हिसलब्लोअरने याप्रकरणी या कंपनीतील एका मोठ्या अधिकाऱ्याचे नाव घेतले आहे. या अधिकाऱ्याने रिक्रुमेंटसाठी, नोकर भरतीसाठी लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये 100 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कंपनीकडे इतके कर्मचारी उच्च मूल्यांसाठी आणि देश सेवेसाठी टाटा समूह ओळखल्या जातो. या समूहाच्या अनेक कंपन्यांनी विविध क्षेत्रात नाव कमावले आहे. टाटाची टीसीएस (TCS) , टाटा कन्सल्टेन्सी सर्व्हिसेज ही जगभर पसरलेली कंपनी आहे. या कंपनीने परदेशातही झेंडे रोवले आहेत. या कंपनीकडे सध्या 6,14,795 कर्मचारी आहे. यातील प्रत्येक पाचवा कर्मचारी हा गेल्या 10 वर्षांहूनही अधिका काळापासून याच ठिकाणी नोकरी करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.