FASTag : प्रवाशांच्या पैशांवर केंद्र सरकार गब्बर! फास्टॅगमधून नोटांचा पाऊस, इतकी झाली कमाई

FASTag : प्रवाशांच्या पैशांनी केंद्र सरकारची तिजोरी भरली आहे. टोल नाक्यावरील फास्टॅगने ही क्रांती आणली. केंद्र सरकराची तिजोरी ओसंडून वाहत आहे. जीएसटीनंतर फास्टॅग पण सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली आहे.

FASTag : प्रवाशांच्या पैशांवर केंद्र सरकार गब्बर! फास्टॅगमधून नोटांचा पाऊस, इतकी झाली कमाई
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 2:36 PM

नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय महामार्ग, सुपर एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्गांमुळे देश जलद आणि मजबूत रस्त्यांच्या नकाशावर आला आहे. या प्रकल्पांचे जगभर कौतूक होत आहे. या दर्जेदार सोयी-सुविधांसाठी अर्थातच प्रवाशी, वाहनधारकांच्या खिशावर ताण येत आहे. पण वेळेची आणि इंधनाची बचत होत असल्याने देशात टोल नाक्याचे (Toll Plaza) मोठे पिक आलं आहे. त्यातून केंद्र सरकारला मोठी आमदनी होत आहे. प्रवाशांच्या पैशांनी केंद्र सरकारची तिजोरी भरली आहे. टोल नाक्यावरील फास्टॅगने (FASTag) ही क्रांती आणली. केंद्र सरकराची तिजोरी ओसंडून वाहत आहे. जीएसटीनंतर फास्टॅग पण सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली आहे.

6 महिन्यांत जमके कमाई गेल्या सहा महिन्यांत म्हणजे या 19 जूनपर्यंत केंद्र सरकारला फास्टॅगमधून 28,180 कोटी रुपयांची कमाई करता आली. 2021 ते 2022 या कालावधीत फास्टॅगमधून केंद्र सरकारच्या उत्पन्नात 46% अधिकची भर पडली. फास्टॅगमुळे पैशांचा पाऊस पडला आहे. केंद्र सरकारची तिजोरी ओसंडून वाहत आहे. भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाच्या (NPCI) आकडेवारीनुसार, मे 2023 पर्यंत देशात एकूण 7.06 कोटी वाहनांवर फास्टॅग होते. 2019 नंतर देशात मोठ्या गतीने फास्टॅग वाढले.

कमाईचे आकडे इतके उंचावले यावर्षी पहिल्या 6 महिन्यांत फास्टॅगमधून 28,180 कोटी रुपये वसूल झाले. फास्टॅगमधून 34,778 कोटी रुपयांहून महसूल वाढला आणि तो 50,855 कोटी रुपयांवर पोहचला. गेल्या 5 वर्षांत 2017 ते 2022 या कालावधीत फास्टॅग महसूल दुप्पटीने वाढला. 22,820 कोटींहून तो 50,855 कोटी रुपयांवर पोहचला. 2021 मध्ये फास्टॅग बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे केंद्र सरकारच्य तिजोरीत पैशांचा महापूर आला आहे.

हे सुद्धा वाचा

FASTag मधून 97 टक्के वसूली सध्या देशभरात 97 टक्के टोलची वसुली ही FASTag च्या माध्यमातून होत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच फास्टटॅगमुळे टोल नाक्यावरील लांबच लांब रांगामधून सूटका होत असली तरी वेळेत म्हणावी तशी बचत होत नसल्याचे समोर आले आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोलमधून 40,000 कोटी रुपयांचे उत्पन्न सरकारला झाले आहे.

आकडे बोलतात

  1. 2019 मध्ये केवळ 1.70 कोटी वाहनांवर फास्टॅग लावलेले होते.
  2. यामध्ये आता 300% वाढ झाली आहे.
  3. देशातील 964 हून अधिक टोल नाक्यांवर फास्टॅग सिस्टिम आहे.
  4. सर्वाधिक टोल प्लाझा मध्य प्रदेशमध्ये आहे. या राज्यात एकूण 143 टोल नाके आहेत.
  5. उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यात 114 टोल नाके आहेत.
  6. फास्टॅग एक इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम आहे.
  7. रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीवर (RFID) ती आधारीत आहे.
  8. प्रत्येक फास्टॅग वाहनाच्या नोंदणीचा तपशील जोडलेला असतो.
  9. फास्टॅगपूर्वी टोल नाक्यावर नगद, रोखीत रक्कम द्यावी लागायची. ही वेळ खाऊ प्रक्रिया होती.
  10. खरेदी केलेले फास्टॅग स्टिकर 5 वर्षांकरीता वैध असते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.