नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी कारकीर्दीतला पाचवा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. आज सकाळीच मोठ्या आत्मविश्वासाने त्यांनी संसद भवनात प्रवेश केला. यावेळी त्यांनी लाल रंगाची साडी (Red Saree) नेसली होती. काळा आणि सोनेरी जरीकाठाची ही साडी अनेकांचं ल वेधून घेणारी ठरली. भारतीय परंपरा आणि हस्तकलेविषयी त्यांचं प्रेम यातून दिसून आलं. निर्मला सीतारमण यांनी नेसलेली ही साडी सुख-समृद्धीचं प्रतीक असल्याचं भारतीय परंपरेत म्हटलं आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेसलेली ही साडी आज चर्चेचा विषय ठरली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यांनी नेसलेली साडी रेड टेंपल साडी म्हणून प्रसिद्ध आहे. कांचीपुरम साड्यांपैकी हा एक प्रकार आहे. दक्षिण भारतातील लोकप्रिय साड्यांमध्ये हा प्रकार गणला जातो.
निर्मला सीतारमण यांच्यामुळे चर्चेत आलेली रेड टेंपल साडी ही दक्षिण भारतातील आहे. तमिळनाडूत तिचा उगम झाल्याचं म्हटलं जातं. या साडीला कांजीवरम किंवा कांचीपुरम असंही म्हटलं जातं. कांचीपुरम शहर सिल्क साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील रेड टेंपल साडीला सर्वाधिक मागणी आहे. ही साडी कधीही आउट फॅशन होत नाही.
रेड टेंपल साडी ही मुळातच सुख-समृद्धीचं प्रतीक आहे. हिंदु धर्मात लाल रंगाला महत्त्व आहे. शक्ती, मजबुती, कणखरपणा, सौभाग्याशी लाल रंगाचं नातं जोडलेलं आहे. लग्नात आणि विशेष प्रसंगांना लाल रंगाला जास्त महत्त्वा आहे. दुष्ट शक्तींचा नाश होतो तर हा रंग परिधान करणाऱ्यासाठी शुभ मानलं जातं..
रेड टेंपल साडी प्युअर रेशमी धाग्यांपासून बनवली जाते. या साड्यांच्या विणकामासाठी दक्षिण भारत आणि गुजरातचा जर आणि रेशमी धागे वापरले जातात. अनेक साड्यांसाठी खास ओरिजनल रेशमी धागे वापरले जाता. यामुळे अधिक मऊपणा, चमक आणि टीकाऊपणा वाढतो.
या साड्यांमध्ये फुलांच्या डिझाइनसह इतर रंगांचा सुरेख वापर केला जातो. याचे फॅब्रिकदेखील हलके आणि ब्रेथेबल अर्थात त्यातून सहजपणे हवा आरपार जाऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात ही साडी नेसणं अत्यंत आरामदायी होतं.
अत्यंत कुशल कारागीर ही साडी विणतात. सीडीची बॉर्डर वेगळी विणली जाते. त्यामुळे अशा प्रकारची साडी विनण्यासाठी कित्येक दिवस लागतात.
रेड टेंपल आणि कांजीवरम साडीचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. सुरेख कलाकुसर आणि तलम कापडानुसार ती तयार केली जाते. जरीकामासोबतच सुंदर बॉर्डर, पदर आणि ब्लाऊज हेदेखील या साडीचं आकर्षण असतं. यावर सोन्याच्या जरीचा वापर केला जातो.
या साडीवरील डिझाइन हिंदू पौराणिक कथांवरून प्रेरीत असते. त्यामुळे ही साडी सुख-समृद्धी सौभाग्याचं प्रतीक असते, असं मानलं जातं.