मुंबई : आपली कार दीर्घकाळ टिकावी असे प्रत्येकाला वाटते आणि लोकं आपल्या कारची तशीच काळजीही घेतात. अशा परिस्थितीत गाडीवर स्क्रॅच (Tips To remove scratch) पडला तरी हजारो रुपये खर्च होतात. तुम्ही कार वॉश करायला गेलात किंवा मेकॅनिककडे गेलात तरी हजारो रुपये मोजावे लागतात पण तुम्ही कधी विचार केला आहे की हा मोठा भूर्दंड सहज वाचवता येणे शक्य आहे. तुमची कार अगदी नवीन चकाचक दिसू शकते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही घरबसल्या कारवरील स्क्रॅच दूर करू शकता आणि मग तुमची कार नवीनसारखी होईल.
कारवरील सर्व प्रकारचे स्क्रॅच काढण्यासाठी तुम्ही प्रथम सॅण्ड पेपर वापरा, सॅण्ड पेपर दहा ते पंधरा मिनिटे पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर ते कारवरील स्क्रॅचवर घासून घ्या. याची विशेष काळजी घ्यावी, जोमाने घासल्यास गाडीचा रंग निघण्याची भीती असते.
रबिंग कंपाऊंडने स्क्रॅच काढा, तुम्ही रबिंग कंपाऊंड स्क्रॅचवर काळजीपूर्वक घासून घ्या आणि नंतर मऊ कापडाच्या मदतीने पॉलिश करा. गाडीच्या पेंटला इजा न होता स्क्रॅच व्यवस्थित आणि काळजीपूर्वक चोळावे लागतील याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अन्यथा, तुम्हाला नंतर हजारो रुपये खर्च करावे लागतील. यानंतर, मायक्रोफायबर कपड्याच्या मदतीने ते स्वच्छ करा. कारचे स्क्रॅच तुम्ही घरीच सहज काढू शकता या स्टेप्स आणि गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही घरच्या घरी गाडीवरील स्क्रॅच सहज काढू शकता. परंतु हे करताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा तुम्हाला नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.