Farmer App : शेतकऱ्यांच्या अडचणी आता एका क्लिकवर होणार दूर, मार्केटमध्ये आले नवीन मोबाईल अ‍ॅप

| Updated on: May 22, 2023 | 7:27 PM

शेतकऱ्यांच्या मदतसाठी शेतकरी पुत्रांनी तयार केला एक भन्नाट अ‍ॅप. या अ‍ॅपद्वारे मिळणार सर्व माहिती. स्वतःला आलेल्या अडचणी इतर शेतकऱ्यांना येऊ नये यासाठी बनवला हा अ‍ॅप...

Farmer App : शेतकऱ्यांच्या अडचणी आता एका क्लिकवर होणार दूर, मार्केटमध्ये आले नवीन मोबाईल अ‍ॅप
DOCTOR KISSAN APP
Image Credit source: socialmedia
Follow us on

नाशिक : दरवर्षी शेतकरी कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जात असतो. या संकटांमुळे त्यांच मोठं नुकसान होतं. शेतकऱ्यांना या संकटाला सामोरे जाता यावे आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी व्हावा, यासाठी नाशीकच्या शेतकरी पुत्रांनी एक भन्नाट अ‍ॅप्लिकेशन तयार केलंय. या अ‍ॅप्लिकेशनद्वारे शेतकऱ्यांना शेती विषयी सर्व माहिती घरबसल्या मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पुत्र सुनील दिंडे, सागर पवार, प्रशांत दिंडे यांनी शेती करत असताना मिळालेल्या अनुभवातून एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलं आहे. या अ‍ॅप्लिकेशनचं नाव ‘डॉक्टर किसान अ‍ॅप’ असं आहे.

शेतकरी पुत्रांनी तयार केले भन्नाट अ‍ॅप्लीकेशन

या ॲप्लिकेशनद्वारे शेतकऱ्यांना पिकांविषयी अडचण, मोफत अनुभवी मार्गदर्शन सल्ला, चार दिवसांचा हवामान अंदाज, पिकांच्या सद्यस्थितीनुसार तज्ज्ञ आणि अनुभवी ऑनलाईन मार्गदर्शन सेवा, प्रश्नांची अचूक उत्तरे, बॅनरद्वारे मोफत सल्ला, सरकारी योजनांबद्दल अद्ययावत माहिती, सर्व पिकांच्या रोगांविषयी माहिती आणि व्हिडिओद्वारे मोफत सल्ला, सर्व प्रकारच्या औषधांची माहिती, जवळील विश्वासू कृषी सेवा केंद्रांची माहिती मिळणार आहे. या सर्व माध्यमातून शेतकऱ्यांना मदत होणार आहे. शेतकऱ्यांचं हित समोर ठेऊन हे अ‍ॅप्लिकेशन बनवण्यात आलं आहे, असं दिंडे यांनी सांगितले.

आताच डाऊनलोड करा हे भन्नाट अ‍ॅप्लीकेशन

हे अ‍ॅप्लीकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झालं आहे. डॉक्टर किसान अ‍ॅप्लीकेशन सर्च करुन हे अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड करता येईल. अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड झाल्यानंतर आपली माहिती भरुन अ‍ॅप्लीकेशन वापरता येईल. हे अ‍ॅप्लीकेशन वापरण्यास अतिशय सोपे आहे, अशी माहिती सुनील दिंडे यांनी दिली.

या अ‍ॅप्लिकेशनद्वारे शेतकऱ्यांना शेतीसंबंधी सर्वच माहिती उपलब्ध होणार आहे.

– या अ‍ॅप्लिकेशनद्वारे शेतकऱ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकाद्वारे मोफत मार्गदर्शन मिळवता येणार आहे.

– सर्व पिकांच्या रोगांविषयी माहिती मिळवता येईल.

– सर्व सरकारी योजनांबद्दल अद्ययावत माहिती आणि सर्व प्रकारच्या औषधांची माहिती मिळवता येणार आहे.

बदलत्या हवामानात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अवकाळी पाऊस, उष्णता, गारपीठ इत्यादी नैसर्गिक संकंटाना सामोरे जातांना शेतकऱ्यांसाठी हे अ‍ॅप्लीकेशन फार उपयुक्त ठरणार आहे. प्रत्यक्ष शेती करतांना आलेल्या अनुभांवरुन शेतकरी पुत्रांनी बनवलेल्या या अ‍ॅप्लीकेशनमुळे शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पिकांची सद्यस्थितीनुसार तज्ञ आणि अनुभवी लोकांकडून ऑनलाईन मार्गदर्शन, सर्व पिकांच्या रोगांविषयी माहिती, बाजार भाव, सरकारी योजना, पीक विमा योजना इत्यादी सुविधा या अ‍ॅप्लीकेशन द्वारे पुरवण्यात येणार आहेत.