Marathi TV & Film Awards 2023
Marathi TV & Film Awards 2023
Marathi TV & Film Awards 2023

पुरस्काराविषयी

TV9 मराठी आपला बायोस्कोप पुरस्कार २०२३

महाराष्ट्रातील नंबर १ मराठी न्यूज चॅनेल TV9 मराठी 'आपला बायोस्कोप २०२३' या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करत आहे. मराठी चित्रपटसृष्टी तसेच मराठी टेलिव्हिजन जगतातील नवोदित तसेच दिग्गज कलाकारांचा सन्मान 'आपला बायोस्कोप' या पुरस्काराने केला जाणार आहे. देशात आज मराठी अशी एकमेव प्रादेशिक भाषा असावी, ज्या भाषेत चौफेर सामाजिक विषयांवर भाष्य करणारे सर्वाधिक चित्रपट तयार होतात.

मराठी चित्रपट, मराठी टेलिव्हिजन या क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने TV9 मराठी 'आपला बायोस्कोप २०२३' या विशेष पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करत आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती, समूह यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 'आपला बायोस्कोप' पुरस्कार हा मराठी कलाजगताला आणखी जवळ आणणारा मंच ठरेल.

मराठी मनोरंजन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कलाकार आणि निर्माते यांच्यासाठी ही खास पर्वणी असणार आहे. या माध्यमातून मराठी मनोरंजन क्षेत्राचं सर्वोच्च यश साजरं करता येणार आहे. मराठी चित्रपट, मराठी टीव्ही मालिका यांची प्रतिभा आणि प्रतिमा अधिक शक्तिशाली असल्याचं 'आपला बायोस्कोप पुरस्कार' सोहळ्यातून अधिक ठळकपणे जगासमोर येणार आहे.


श्रेणी

  • सर्वोत्कृष्ट मराठी
    मालिका
  • सर्वोत्कृष्ट मुख्य
    अभिनेता
  • सर्वोत्कृष्ट मुख्य
    अभिनेत्री
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक
    अभिनेता
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक
    अभिनेत्री  
  • सर्वोत्कृष्ट
    खलनायक
  • सर्वोत्कृष्ट
    खलनायिका
  • सर्वोत्कृष्ट
    जोडी
  • सर्वोत्कृष्ट
    दिग्दर्शक
  • सर्वोत्कृष्ट
    नॉन-फिक्शन
  • सर्वोत्कृष्ट मराठी
    चित्रपट
  • सर्वोत्कृष्ट मुख्य
    अभिनेता
  • सर्वोत्कृष्ट मुख्य
    अभिनेत्री
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक
    अभिनेता
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक
    अभिनेत्री   
  • सर्वोत्कृष्ट
    खलनायक
  • सर्वोत्कृष्ट
    जोडी
  • वर्षातील सर्वोत्कृष्ट
    गाणे
  • सर्वोत्कृष्ट
    दिग्दर्शक

नामांकन निकष

TV9 मराठी

हे चॅनल भारतातील नंबर 1 न्यूज नेटवर्क TV9 नेटवर्कचा भाग आहे. TV9 मराठी मागील 1 वर्षापेक्षा जास्त काळापासून महाराष्ट्रातील निर्विवाद नंबर 1 मराठी न्यूज चॅनेल आहे. राज्यातील सर्व स्तरातील प्रेक्षकांची पहिली पसंती आहे. (स्रोत: BARC इंडिया)

महाराष्ट्रातील राजकीय तसेच मोठ्या घडामोडी सर्वात आधी लोकांपर्यंत पोहोचवण्यात TV9 मराठी आघाडीवर आहे. टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाइव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी प्रेक्षक TV9 मराठीला पहिली पसंती देतात. राज्यातील प्रभावशाली व्यक्ती आणि विविध क्षेत्रातील दिग्गज विश्वासार्हता म्हणून TV9 मराठीकडे पाहतात.